
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष आणि बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडुस्कर यांनी आज मंगळवारी आपल्या सहकाऱ्यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते. या स्नेहभोजनाला रमाकांत कोंडुस्कर सर्वांच्या परिचयाच्या दादांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शविली.
रमाकांत कोंडुस्कर राजकारणा बरोबरच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहीले आहेत. श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून बेळगाव परिसरात आणि जिल्हाभरात अनेक सामाजिक उपक्रम रमाकांत कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनावरून नुसार सातत्याने राबविण्यात येत असतात. यामुळेच रमाकांत कोंडुस्कर यांना जनतेमधून प्रेमाने आपल्या हक्काचा माणूस या भावनेतून दादा म्हणून ओळखले जाते.
रमाकांत कोंडुस्कर आणि त्यांचे कट्टर समर्थक आणि सहकारी सातत्याने जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, रात्रंदिवस प्रयत्नशील असतात. कोरोना महामारीच्या काळातही श्रीराम संघटनेच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची लोकोपयोगी कामे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.
विश्वासाने आपल्या पाठीशी राहणाऱ्या आणि सदैव सहकार्य करणारे तसेच आपले आवाहन आणि सुचनेनुसार रात्रंदिवस कार्य करणारे कार्यकर्ते यांच्यासाठी आज मंगळवारी सायंकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. आपल्या लाडक्या दादांच्या आमंत्रणाला प्रतिसाद देऊन हजारोंच्या संख्येने लोकांनी श्रीमंगाई देवी परिसरात महाप्रसाद स्नेहभोजनाला उपस्थिती दर्शविली. प्रचंड गर्दी झाली असताना श्रीराम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्धतेने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्रकर्षाने दिसून आले. आज मंगाई देवी मंदिर परिसरात झालेली गर्दी पाहून, प्रत्येक जण श्री मंगाई देवीचे यात्राच भरल्याची चर्चा करीत होते.
Belgaum Varta Belgaum Varta