बेळगाव : सालाबाद प्रमाणे बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातर्फे तिथीनुसार आज शुक्रवारी सकाळी शके 1944 फाल्गुन वद्य तृतीयेला श्री शिवजयंती साजरी करण्यात आली.
शहापूर येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यानामध्ये या शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते उद्यानातील शिवछत्रपतींच्या सिंहासनारूढ मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. पूजा विधीची सुरुवात ध्येय मंत्राने झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. कार्यक्रमास शिवसेना उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, प्रदीप सुतार, विनायक हुलजी, चेतन शिरोळकर, प्रभाकर देसाई, रघुनाथ चव्हाण, भालचंद्र उचगावकर, महेश मजूकर, प्रतीक देसुरकर, भाऊ केरवाडकर, सनी रेमानाचे, प्रकाश हेब्बाजी, विठ्ठल हुंदरे, विजय मुरकुटे, लक्ष्मण चतुर, महिपाल इतापाचे, अमर कडगांवकर आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta