मुडलगी : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगीजवळ कार आणि टँकरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत नवविवाहित दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
तालुक्यातील हळ्ळूर गावाजवळ कार आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन नवविवाहित दाम्पत्याचा लग्नाच्या दहाव्या दिवशी मृत्यू झाला.
महाराष्ट्रातील इंद्रजीत मोहन दम्मनगी (27) आणि कल्याणी इंद्रजीत दम्मनगी (24) यांचा मृत्यू झाला. नवविवाहित जोडपे शनिवारी कारमध्ये बदामी येथील बनशंकरी देवीचे दर्शन घेऊन घरी परतत असताना निपाणी- मुधोळ राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला. कार आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला.
मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून गुन्हा दाखल केला.
Belgaum Varta Belgaum Varta