बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कट्टनभावी, निंगेनहट्टी, गुरामहट्टी कडोली वगैरे ग्रामीण परिसरात विविध प्रकारची दोन लाख झाडे लावणारे व इतरत्रही असेच वृक्षारोपण व संवर्धन करणारे, तसेच ज्यांनी तलाव, विहिरी व बंधाऱ्याची निर्मिती करून ही भूमी ओलिताखाली आणली ज्यामुळे माणसेच नव्हे तर पशुपक्षीही सुखावले. नरेगा या योजनेमधून सर्वांना काम मिळवुन देणारे
यासोबतच निरक्षरासाठी प्रौढ शिक्षण तसेच अरण्य भागात मुलामुलींसाठी शिक्षण सुरू करणारे डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या या आदर्श आणि प्रेरणादायी कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने त्यांच्या निगर्वी साध्या राहणीमानाला, उच्च जीवन मूल्यांना आणि कर्तृत्व संपन्नतेला वंदन करून जायंट्स मेनच्या वतीने “जायंट्स भूमिपुत्र” या पुरस्काराने सन्मानित करीत आहेत.
हा पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दि. ०२ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे, असे सुनिल मुतगेकर आणि लक्ष्मण शिंदे यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta