बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या बेळगाव शाखेची 2023 ते 2018 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवार दि. 23 जुलै 2023 रोजी बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी येथे होणार आहे.
सदर निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अनिल गुडी हे काम पाहणार आहेत. अ. भा. नाट्य परिषद मुंबईच्या बेळगाव शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा तपशीलवार कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल. 1) उमेदवारी अर्ज उपलब्ध होण्याची तारीख दि. 7 जुलै 2023, 2) उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख दि. 10 जुलै 2023, 3) अर्ज छाननी आणि वैध अर्ज जाहीर करण्याची तारीख दि. 12 जुलै 2023, 4) अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख दि. 15 जुलै 2023, 5) पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्याची तारीख दि. 17 जुलै 2023 रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पहावयास मिळेल, 6) निवडणूक मतदानाची तारीख दि. 23 जुलै 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. सदस्यांनी मतदानास येताना आपले ओळखपत्र आपल्या जवळ ठेवणे आवश्यक आहे. 7) मतदान केंद्र बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसाठी उमेदवारी अर्ज प्लॉट नं. 5, ग्राउंड फ्लोअर, पायोनियर लँडमार्क अपार्टमेंट, डॉ. आर. के. मार्ग हिंदवाडी येथे सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी निवडणूक अधिकारी अनिल गुडी (9845545468) किंवा मौसमी भातकांडे (9844614788) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अ. भा. नाट्य परिषद बेळगाव शाखेच्या अध्यक्षा प्रा. डाॅ. संध्या देशपांडे आणि मुख्य कार्यवाह मौसमी भातकांडे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta