सांबरा : सांबरा ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली. अध्यक्षपदी रचना राहुल गावडे तर उपाध्यक्षपदी मारुती टोपाण्णा जोगाणी हे निवडून आले आहेत. मंगळवार दि. २५ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. अध्यक्षपद सामान्य महिला तर उपाध्यक्षपद सामान्य पदासाठी जाहीर करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे रचना राहुल गावडे, काँग्रेसतर्फे सुलोचना मारुती जोगाणी व म. ए. समितीकडून राजश्री दौलत जोई यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र राजश्री जोई यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने भाजपच्या रचना राहुल गावडे यांनी १८ मते मिळवून विजय मिळवला. तर काँग्रेसच्या सुलोचना जोगाणी यांना १५ मतांवर समाधान मानावे लागले.
उपाध्यक्ष पदासाठी भाजपातर्फे मारुती जोगाणी, म. ए. समितीतर्फे भुजंग गिरमल व काँग्रेसच्या वतीने प्रशांत गिरमल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील प्रशांत गिरमल यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने भाजप व समितीमध्ये लढत झाली. यात भाजपाचे मारुती जोगाणी यांनी १९ मते घेऊन विजय मिळविला. तर भुजंग गिरमल यांना १४ मतावर समाधान मानावे लागले. निवडणूक अधिकारी म्हणून शहर शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta