
येळ्ळूर : येळ्ळूर मधील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या नेताजी युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच संघटनेच्या वतीने जांबोटी (ता.खानापुर) येथे आयोजित शिबिरात करण्यात आली. या निवड कमिटीच्या अध्यक्षस्थानी नेताजी युवा संघटनेचे माजी अध्यक्ष डी. जी. पाटील हे होते. यावेळी नेताजी युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊन, नेताजी युवा संघटनेच्या अध्यक्षपदी किरण गिंडे यांची तर सेक्रेटरी पदी के. एन. पाटील, खजिनदारपदी प्रा. सी. एम. गोरल, ऑडिटर म्हणून संजय मजूकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारणीचे स्वागत माजी अध्यक्ष डी. जी. पाटील, नेताजी सोसायटीचे उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे, संचालक सी. एम. उघाडे, रवींद्र गिंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी संघटनेचा कार्यभार व्यवस्थित चालवून, प्रगती साधणार असल्याचा निश्चय व्यक्त केला. यावेळी नेताजी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आर. एम. मुरकुटे, संचालक सी. एम. उघाडे, रविंद्र गिंडे, परशराम गिंडे, गणपती हट्टीकर, भोमाणी छत्र्यांण्णावर, शंकर मुरकुटे, अनिल मुरकुटे, पांडुरंग घाडी, प्रभाकर कणबरकर, मीनाजी नाईक, वसंत मुचंडी, जोतिबा पाटील, जोतिबा गोरल आदी यावेळी उपस्थित होते शेवटी प्रा. सी. एम. गोरल यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta