Sunday , December 14 2025
Breaking News

दुरुस्तीच्या कामामुळे उद्या शहर-उपनगरात वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

बेळगाव : नेहरुनगर येथील ११० केव्ही उपकेंद्र व सदाशिवनगर येथील ३३ केव्ही वीजकेंद्रात दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत शहर व उपनगरांतील काही भागात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी एका पत्रकाद्वारे शुक्रवारी ही माहिती दिली आहे. इंडाल, इंडाल क्वॉर्टर्स, यमनापूर परिसर, वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई इस्पितळाचा पाठीमागील परिसर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, संगमेश्वरनगर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, बॉक्साईट रोड, शिवबसवनगर, गँगवाडी, केएबी क्वॉर्टर्स, डिमार्ट, जेएनएमसी, एस. जी.बी.आय.टी. रोड परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ सर्कल, त्रिवेणी, जुने पोलीस आयुक्त कार्यालय, सुभाषनगर डबल रोड, रेलनगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, क्लब रोड, टीव्ही सेंटर, पीऍण्डटी कॉलनी (हनुमाननगर), मुरलीधर कॉलनी, नेहरुनगर, जिनाबकुल इंडस्ट्रीज एरिया, कोल्हापूर सर्कल, सिव्हिल हॉस्पिटल रोड परिसरातही रविवारी वीजपुरवठा असणार नाही.

सुभाषनगर, रामदेव हॉटेल परिसर, एसपी ऑफिस रोड, हनुमान हॉटेल, नेहरुनगर, केएलई रोड, एसपी ऑफिस, मनपा कार्यालय, मराठा मंडळ, विश्वेश्वरय्या हनुमाननगर, नगर, रेलनगर, सदाशिवनगर, पीडब्ल्यूडी क्वॉर्टर्स, डी. सी. बंगला, जाधवनगर, हनुमाननगर डबल रोड, क्लब रोड, हेस्कॉम व केपीटीसीएल कार्यालय व क्वॉर्टर्स, केएलई एचटी प्रकल्प, हनुमाननगर स्टेज १ व २, कुमारस्वामी लेआऊट, पोलीस कॉलनी, इरिगेशन कॉलनी, सारथीनगर, हनुमाननगर स्टेज ४ व ५, कुवेंपूनगर, मॉडर्न को-ऑप. हाऊसिंग सोसायटी (बसवेश्वरनगर), बॉक्साईट रोड, टीव्ही सेंटर, कुमारस्वामी लेआऊट, मुरलीधर कॉलनी, प्रेस कॉलनी, मुंगुरडेकर कॉलनी, सह्याद्रीनगर व पाणीपुरवठा प्रकल्पावरील वीजपुरवठाही रविवारी खंडित राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *