
बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरामध्ये रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. याची दखल घेत वॉर्ड क्र. 42 चे नगरसेवक अभिजित जवळकर यांनी भाग्यनगर दुसरा क्रॉस परिसरात आज सकाळी कचरा टाकण्यास मनाई असल्याचा फलक उभारला.
भाग्यनगर दुसरा क्रॉस परिसरात रस्त्याकडेला कचरा टाकण्यात येत होता. कचऱ्याची उचल होईपर्यंत परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे तसेच या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्नाच्या शोधार्थ परिसरातील भटकी कुत्री जमत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकाना दुर्गंधीसोबत भटक्या कुत्र्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नगरसेवक अभिजित जवळकर यांनी भाग्यनगर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याची उचल करावयास लावली. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध असल्याचा महानगरपालिकेचा फलकही उभारला. परिसरातील नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून घंटागाडीकडे सुपूर्द करावा, असे आवाहन केले आहे.
मनपा आरोग्य निरीक्षक अनिल बुडवाई, सफाई कंत्राटदार राकेश मासेकर, सुपरवायझर मोहन शिंदे, संतोष कोलकार, अनिल अनंतपुर, सतीश भोसले, शांता कोलकार, मीनाक्षी नेसरी, हंचनम्मा, गीता, शांता, कल्पना आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta