
बेळगाव : चलवेनहट्टी येथील नवरात्र उत्सव मंडळच्या वतीने दुर्गा मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते तसेच यावर्षीही मंडळाने भव्य प्रमाणात दुर्गा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली असून दुर्गा उत्सवाची मुहूर्तमेढ करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी सदस्य आणि उपस्थित होते. येणाऱ्या नवरात्र उत्सवात मडळाने वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत तसेच भक्ती संगीत हरिपाठ तसेच विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा, डान्स स्पर्धासह वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. तसेच गावामध्ये दररोज सकाळी भव्य प्रमाणात दौंडचेही आयोजन करण्यात येत असते. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य गावातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta