राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा
बेळगाव : राजकीय व सामाजिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक, कृषी, शिक्षण, क्रीडा या क्षेत्रामध्ये आदरणीय शरद पवार यांचे उत्तुंग कार्य असून, त्यांचे व्यापक कार्यसमाज घटकासाठी विशेषतः युवा पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे. शरद पवार फक्त मराठी मुलखापर्यंत सीमित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. देशातील समाजाला व युवकांसाठी नेहमी प्रेरणा देतील, असे प्रतिपादन कवी प्रा. निलेश शिंदे यांनी माननीय श्री. शरदचंद्रजी पवार यांचे “जीवनकार्य आणि सामाजिक योगदान एक चिंतन” या विषयावर ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बेळगाव जिल्हा शाखा यांच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त विशेष व्याख्यान आणि विविध कार्यक्रम व वाढदिवस बेळगांव जिल्हा पक्षाच्या कार्यालयात मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री. जोतिबा पाटील होते. प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते व एस.सी/ एस.टी. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राष्ट्रीय राज्य सचिव श्री. दुर्गेश मेत्री, प्रेमा पाटील, माजी बेळगांव जिल्हा अध्यक्षा प्रभावती भालेकर, रुक्मिणी बल्लारी, रामकृष्ण सांबरेकर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. स्वागत शाम मंतेरो यांनी केले. प्रास्ताविक अमोल देसाई यांनी केले. परिचय आर. के. पाटील यांनी करून दिला. सुत्रसंचलन विनायक पाटील यांनी केले. तर आभार गौतम कांबळे यांनी मानले.
यावेळी गोपी मेलगे, धनपाल अगसीमनी, साईकिरण बल्लारी, सिद्धरामय्या बेळगुंदकर, विनय पाटील, अरुणा साके, निखत सय्यद, शबाना मुल्ला, आप्पाजी सपले, आकाश देसाई, मुनीर लतिफ, चांदणी बागवान, स्वप्नील हिंडलगेकर, मारुती सपले, यासह पक्षाचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta