
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 17 जानेवारी 2024 रोजी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. या कार्यक्रमासंदर्भात पोलीस खात्याच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळीची आज सायंकाळी कॅम्प येथील सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अरुण कुमार लोकूर आणि खडेबाजार पोलीस स्टेशनचे सीपीआय श्री. विजय निंबाळकर यांच्याशी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. समितीचे कार्यक्रम अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडा अशी विनंती पोलीस खात्यातर्फे करण्यात आली. समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अभिवादनाचा कार्यक्रम कशाप्रकारे होतो याची माहिती घेतल्यानंतर सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी व अभिवादन कार्यक्रम पार पाडावा. ठरलेल्या मार्गाने जाऊन योग्य ती खबरदारी घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा, अशी विनंती ही पोलिसांनी केली. बेळगावातील सर्व जनतेने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta