
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक 17 जानेवारी रोजी भाई एन. डी. पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये प्रथमता एन. डी. पाटील यांच्या फोटोचे पूजन शाळेच्या शिक्षिका रेणू सुळकर व मंजुषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर भाई एन. डी. पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेण्यात आला. भारती शिराळे यांनी त्यांचे सामाजिक कार्य याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. रेणू सुळकर यांनी भाई एन. डी. पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक कार्या विषयी माहिती दिली. तर मंजुषा पाटील यांनी एन. डी. पाटील यांचे सामाजिक चळवळीतील योगदान याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत, एन. सी. उडकेकर व सर्व शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन गौरी ओऊळकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta