कावळेवाडी : साहित्याचे वाचन करा. साहित्यातून समाज घडविण्याचे कार्य होते कविता जगण्याचा मार्ग दाखवते कवी श्रेष्ठ असतो. आजूबाजूच्या घडत जाणाऱ्या घटनांवर तो भाष्य करतो शब्दातून तो व्यक्त होत जातो. मनातील भावभावनांचे सुंदर जग तो काव्यातून प्रकट करतो मराठी भाषा संवर्धनासाठी असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ मिळते ग्रामीण भागातील वास्तव जीवन कवितेच्या माध्यमातून पुढे येत आहे हेच या कविसंमेलनाचे यश आहे असे मौलिक विचार नामदेव मोरे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी ईशस्तवन स्वागत गीत सादर केले. दीपप्रज्वलन एस. एम. जाधव, पी. आर. गावडे, के. आर. भाषकळ, डॉ. परशराम हुंदरे, यशवंत मोरे यांच्या हस्ते झाले. सरस्वती फोटो पूजन आर. बी. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन तेजस्विनी कांबळे, मनोहर मोरे यांनी स्वागत केले.
पश्चिम विभाग शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव संमेलनाचे उद्घाटक यांनी असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. त्यातून विद्यार्थ्यांना लेखन करण्यासाठी प्रेरणा मिळते. कावळेवाडी वाचनालयतर्फे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या
वाचनालयचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात गेल्या सहा वर्षांपासून मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित आहे खूप छान प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था मुंबईकडून अनुदान मिळते त्यासाठी आभार व्यक्त केले
बहारदार कविसंमेलनात खूप ताकदीच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या संमेलनात कवी प्रा. अशोक आलगुंडी यांनी शाळा कविता सादर करून आपल्या शालेय जीवनातील शाळेच्या आठवणी जाग्या केल्या. बसवंत शहापूरकर यांनी “बालपण” कविता सुरेख आवाजात गाऊन खेड्यातील जीवन आनंदमय सुखमय असते कवितेतून व्यक्त केले.
खास या संमेलनात दामोदर मुळीक (गोवा) यांनी उपस्थित राहत मैत्र, कविता गाऊन मैत्रीची महती काव्यातून सांगितले. शिवाजी शिंदे यांनी सीमा भागात मराठी माणसाचे मराठीवरील प्रेम सांगुन चिंतनशील भाव व्यक्त केले. ज्येष्ठ कवी वाय. पी. नाईक यांनी जत्रेत हरवलेला गाव! ही कविता सादर करून, गावागावांतील जत्रा कशा सामान्य माणसाला कर्जबाजारी बनवतात अशी प्रबोधनात्मक आशयाची कविता सादर केली.
अशा एकापेक्षा एक सरस कविता सादर करून संमेलनात रंगत आणली प्रा.महादेव खोत, (लोकशाही), चंद्रशेखर गायकवाड,(शाळेला जाऊ), भरत गावडे (गाढवाला लागली लॉटरी), बाबुराव पाटील (तुर्केवाडी) यांची आई वरील कविता, जयवंत जाधव (कोवाड), नामदेव मोरे, रोशनी हुंदरे, स्मिता किल्लेकर, अस्मिता आळतेकर, यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
विशेष म्हणजे बिजगर्णी हायस्कूलच्या मुलिंनी आपल्या कविता सादर करून, काव्य लेखनातून व्यक्त होता येतं, भविष्यात दमदार कविता लिहिली जाईल असे आश्वासक चित्र उभे केले. दहावीतील विद्यार्थीनी, समिक्षा भाषकळ, ऐश्वर्या कोळी, संचिता जाधव, प्रज्ञा बिर्जे, यांनी छान सादर केले.
तेजस्विनी कांबळे (बाप) ही कविता सादर करून बापाचा आधार कसा महत्त्वाचा असतो हे कवितेतून मांडले.
यावेळी सहभागी कविंचा सन्मान करण्यात आला, रोख रक्कम सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ, गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
व्यासपीठावर एस. एम. जाधव, वाय. पी. नाईक, नामदेव मोरे, पी. आर. गावडे, आर. बी. देसाई, डॉ. परशराम हुंदरे, के. आर. भाषकळ, वाय. एच. पाटील, ए. एल. निलजकर, बसवंत शहापूरकर, अशोक आलगुंडी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला रमेश कांबळे, यशवंत मोरे, एम. पी. मोरे, एस.एन. जाधव, विजय सावी, सुरेश निंबाळकर, पी.एस. भाष्कर, प्रसाद जाधव, सौ. आर.पी सरवणकर, सौ.भाष्कळ उपस्थित होते
विद्यार्थी, पालक, मराठी भाषा साहित्य रसिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले. आभार प्रा. अशोक अलगोंडी यांनी मानले.