बेळगाव : हातगाडीवाले, बैठ्या विक्रेत्यांनी व्यापलेले बेळगावमधील मुख्य बाजारपेठेतील रस्ते रहदारी पोलिसांनी मंगळवारी मोकळे केले. उत्तर रहदारी विभागाचे सीपीआय आर. एफ. नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव बाजारपेठेतील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, शनिवार खूट, काकतीवेस आदी मार्गांवरील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. या परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर रहदारी विभागाने हि मोहीम आखली होती. रस्त्यावरील बैठे व्यापारी, विक्रेते आणि हातगाडीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात रस्ता व्यापला होता. याशिवाय येथील व्यापाऱ्यांनीही आपल्या जाहिरातीचे फलक रस्त्यावर लावले होते. शहरातील या प्रमुख मार्गांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने पार्किंगची समस्या सातत्याने निर्माण होत होती. पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी अडचण येत होती. याबाबत सातत्याने सूचना देऊनही व्यापारी हटत नव्हते. त्यामुळे, उत्तर रहदारी विभागाचे सीपीआय आर. एफ. नदाफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे बाजूला काढत रस्ते रिकामे केले. या सर्व विक्रेत्यांना रहदारी पोलिसांनी सूचना दिल्या असून रस्त्यावर अतिक्रमण केल्यास साहित्य जप्त करण्यात येईल, असा इशाराही दिला.
Belgaum Varta Belgaum Varta