बेळगाव : बेळगावमधील श्री शनैश्वर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेण्यात आली.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊस येथे किरण जाधव आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल, संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याशी संबंधित उपक्रम तसेच संस्थेच्या नूतन इमारतीचा आराखडा खासदारांना दाखविण्यात आला. याचप्रमाणे ताशिलदार गल्ली येथील रेल्वे उड्डाणपुलाबाबत काही महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल चौधरी, संजय भावी, शिवराज पाटील, महांतेश देसाई, श्रीमती गीता कट्टी, किरण जाधव, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta