
बेळगाव : गोवा येथे राष्ट्रीय स्तरावर खेळ प्राधिकरण टी ए एफ् आय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत येळ्ळूरच्या महिला कुस्तीपटूनी घवघवीत यश संपादन केले. म्हापसा येथील पेडम स्पोर्टस कॉम्प्लेक्स गोवा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत बेळगाव, गोवा, केरळ, आंध्रप्रदेशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात कु. आराध्या भरमाण्णा हलगेकर कलमेश्वर नगर येळ्ळूर हिने 32 किलो तसेच कु. समिक्षा अदिनाथ धामणेकर सांबरेकर गल्ली येळ्ळूर हिने 56 किलो गटामध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक मिळवून यश संपादन केले यांना कुस्ती प्रशिक्षक श्री. मारुती घाडी यांचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta