Friday , December 12 2025
Breaking News

“लक्ष्या- बाळ्या” हटाव मोहिमेचा खरा सूत्रधार “दिग्गुभाई”च!

Spread the love

 

बेळगाव शहरात सध्या चर्चेत असणाऱ्या “त्या” बँकेच्या अध्यक्षांचे प्रताप हे दिवसागणिक आणखीनच उघडे पडत आहेत. मुळात अध्यक्ष झाल्यानंतर केलेला गैरकारभार हा ट्रेलरच म्हणावा लागेल कारण खरा पिक्चर तर अध्यक्ष होण्याआधीपासूनच “दिग्गुभाई”ने सुरू केला होता. 2020 साली पार पडलेल्या बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्री “दिग्गुभाई”ने लक्ष्या-बाळ्या हटाव (समाजाच्या नावाची) बँक बचाव अशा आशयाचे पत्रक टिळक चौकपासून ते उचगावच्या वेशीपर्यंत सर्वत्र चिटकवले होते. निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्रीच्या अंधारात केलेला हा कारभार एवढ्यावरच थांबत नसून दिग्गुभाईने बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या पायरीवर देखील ते पत्रक चिटकवले होते. बँकेचे माजी अध्यक्ष हे उचगावचे रहिवासी असल्याने त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने हा सगळा खालच्या पातळीचा उपद्व्याप “दिग्गुभाई”ने केला होता. हा सगळा प्रकार त्यांनी आपल्या दोघा हस्तकांच्या गुंडांकरवी घडविला होता. पण “त्या” माजी अध्यक्षाच्या आक्रमक पवित्र्यामुळे घाबरून पहाटेलाच पुन्हा ते पत्रक “दिग्गुभाई”ने उतरवले आणि आपण किती चांगले आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सर्वांसमोर केला. बँकेच्या इतिहासात भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या “दिग्गुभाई”चे डोके निवडणुकीच्या प्रक्रियेत चालले नसेल असे होणार नाही. “दिग्गुभाई”च्या काळ्या विचारांची मुहूर्तमेड निवडणुकीपासूनच रोवली गेली होती. त्यामुळे बँकेच्या व्यवहारात केलेला गैरकारभार हा जणूकाही पूर्ववत ठरवलेलाच कार्यक्रम असावा असे वाटते. कारण बँकेच्या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी आपल्या विरोधात असणाऱ्या सभासदांच्या खात्यामध्ये फेरफार करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी चक्क पुण्यापर्यंत आपली माणसे “दिग्गुभाई”ने पाठवली होती. कारण बँकेला सॉफ्टवेअर पुरविणारी कंपनी ही पुण्याची असल्याने तेथूनच लोकांच्या खात्यात फेरफार करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा प्रकार केला गेला असावा. पुन्हा एकदा आपल्या अधिकाराचा गैरवापर करून असले प्रकार केले जाण्याची शक्यता असल्याने सभासदांनी जागरुक राहणे गरजेचे आहे. या सगळ्या प्रकारात लक्ष्याने जरी प्रखर भूमिका घेतली असली तरी बाळ्याने मात्र पैशासाठी आपली इभ्रत आणि घराण्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. अशा खालच्या प्रवृत्तीच्या माणसाला सभासदांच्या मार्फत दबाव टाकून राजीनामा द्यायला भाग पाडावे अशी इतर संचालकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
बँकेच्या भरती घोटाळ्याबद्दल केंद्र व राज्य सरकारच्या सहकार विभागाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे “त्या” कर्मचार्‍यांवर टांगती तलवार?

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे समिती कार्यकर्त्यांचे जाहीर आभार

Spread the love  बेळगाव : दिनांक आठ डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *