
बेळगाव : महाद्वार रोड क्रॉस नंबर चार समस्यांच्या विळख्यात सापडला असून वारंवार मागणी करून देखील संबंधित नगरसेवकांचे व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. महाद्वार रोड येथील क्रॉस नंबर चार मधील गटारी मागील दोन वर्षांपासून तुंबलेल्या अवस्थेत आहेत. विद्यमान नगरसेविकेला वारंवार सांगून देखील गटार स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफाईड यासारखे आजार तोंड वर काढत आहेत. त्यात गटारी तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही त्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. शहर व परिसरात ठिकठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळत असताना देखील महानगरपालिका या गटार स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे. महाद्वार रोड परिसरातील गटार लवकरात लवकर स्वच्छ करा अन्यथा रास्ता रोकोचा इशारा येथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta