बेळगाव : कावळेवाडी येथील उदयोन्मुख धावपटू प्रेम यल्लापा बुरुड याचा गावात नागरी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयचे अध्यक्ष वाय. पी. नाईक उपस्थित होते.
प्रारंभी ऍड. नामदेव मोरे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. गावातील यल्लापा बुरुड यांनी अथक परिश्रम घेऊन गरीब परिस्थितीमध्ये धावपटू प्रेमला गरुड भरारी घ्यायला पालक या नात्याने बळ दिले. त्यामुळे प्रेम ला खेळाची आवड निर्माण झाली. अवघ्या सहाव्या वर्षापासून धावण्याचा सराव केला. विविध ठिकाणच्या स्पर्धांतून यशस्वी झाला. या त्याच्या अतुलनीय कामगिरी बद्दल भारतीय लष्करी क्रीडा केंद्रात मद्रास रेजिमेंटमध्ये निवड झाल्याबद्दल, गावातील वाचनालय, ग्रामस्थ मंडळ, ग्रामपंचायत बिजगर्णी, विविध संस्थांमार्फत प्रेमचा नागरी सन्मान करण्यात आला. वेलिंग्टन येथे रूजू होण्यासाठी तो आज संध्याकाळी रवाना होणार आहे.
या त्याच्या उत्तुंग भरारीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर बिजगर्णी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, जोतिबा मोरे, कल्लापा यळुरकर, संतोष दरेकर, मारुती कार्वेकर, रघुनाथ मोरे, मारुती कांबळे, सौ.लक्ष्मी बुरुड, यल्लापा बुरुड, राजू बुरुड, के.आर.भाष्कर, अभि तुडयेकर आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी प्रा.पी.व्ही. नाकाडी, मनोहर बेळगावकर, नामदेव मोरे, के.आर. भाष्कर, यांनी आपले मनोगत व्यक्त करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संतोष दरेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. आर्थिक सहकार्य करुन प्रेमला प्रेरणा देण्याचे कार्य दरेकर यांनी केले. गावातील वाचनालयकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. याबद्दल बुरुड कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त केली. पंचक्रोशीतील मान्यवरांनी शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ,रोख रक्कम देऊन प्रोत्साहन दिले. मारुती कांबळे, मुन्ना कांबळे (बेळवट्टी, मनोहर बेळगावकर, नामदेव मोरे, के आर भास्कर, प्रा.पी. व्ही. नाकाडी (हाजगोळी), बी.एस. देवरमणी (कल्लेहोळ), सूरज कोरडे (चिरमुरी), मोहन शिगेहळ्ळी (हुंचेनट्टी), बसू काकतीकर (कडोली), प्रकाश पावशे (जानवाडी), कल्लापा चौगले, गुंडू सावंत, अशोक बाचीकर, पुंडलिक मोरे मल्लापा मोरे, मंथन सोसायटी बिजगर्णी, नेताजी सोसायटी कर्ले, प्राथमिक शाळा कावळेवाडी, माध्यमिक विद्यालय कर्ले आदींनी सन्मानित केले.
विशेष गाडीत बसून या गुणवंत खेळाडूची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीने, सुहासिनींच्या आरती ओवाळून शुभेच्छा दिल्या. अख्खा गावांनी कौतुक करुन शुभेच्छांचा वर्षाव केला.