बेळगाव : श्री. रमाकांत दादा कोंडुस्करांच्या पाठपुराव्यामुळे व सतत प्रयत्नाने गेल्या दीड वर्षात शेकडो गरजू रुग्णांना आर्थिक मदत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता निधी या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख श्री. मंगेश चिवटे बेळगाव दौरा दरम्यान केएलई हॉस्पिटलला भेट दिली होती त्यादरम्यान प्रशांत हंडे या रुग्णाची त्यांना कल्पना दिली असता त्यांनी त्या दिवशीच त्यांचा अर्ज स्वीकारून त्यांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती व ज्या वेळेला प्रशांत हे हॉस्पिटल येथे ऍडमिट होऊन उपचार घेतात त्यावेळेला त्यांची रक्कम पोहोचणार असं सांगितलं होतं. तसेच ॲडमिट झाल्यानंतर हॉस्पिटलला ती माहिती पोहोचवण्यात आली होती आणि त्याचप्रमाणे यशस्वीरित्या प्रशांत हंडे यांच्यावर उपचार झाले आहेत त्यांना त्यांच्या आईने आपली किडनी दिली व आपल्या एका मुलाचे त्यांनी प्राण वाचवले. दोघेही आता व्यवस्थितरित्या उपचार घेत आहेत. त्यांना आज दोन लाखाचं यूटीआर पत्र महाराष्ट्र शासनाचं श्री. रमाकांत दादा यांच्या हस्ते त्यांच्या नातेवाईकांना पोहोचवण्यात आलं व पुन्हा एकदा समाजातील विविध क्षेत्रातील मंडळी यांना पुन्हा एकदा आवाहन केले की त्यांनी हंडे कुटुंबियांना मदत करावी. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर व मध्यवर्तीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.
हंडे कुटुंबीयांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे , महाराष्ट्र राज्य वैद्यकीय पक्षाचे प्रमुख श्री. मंगेश चिवटे व महाराष्ट्र एकीकरण समितीचे आभार व्यक्त केले.