बेळगाव : सायकलवरून चार धाम यात्रा करून परतलेला येळ्ळूरचा साहसी युवक अनंत धामणेकर याचा बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौक आणि येळ्ळूर गावातील श्री चांगळेश्वरी देवी मंदिर येथे सत्कार करण्यात आला.
अनंत धामणेकर याने युवा जागृतीसाठी सायकलवरून 4000 कि. मी. अंतराचा प्रवास अवघ्या 40 दिवसात करत देशातील चार धाम यात्रा पूर्ण केली.
बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर व आर. एम. चौगुले यांनी पुष्पहार घालून घालून तसेच शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे येळ्ळूर गावातील श्री चांगळेश्वरी मंदिर येथे माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी शाल, श्रीफळ देऊन अनंत धामणेकर याचा सत्कार केला.
यावेळी आपल्या उपक्रमाबद्दल माहिती देताना अनंत धामणेकर म्हणाला की, सदर यात्रेचा बेळगावपर्यंतचा 4000 कि.मी. अंतराचा प्रवास आपण 40 दिवसात पूर्ण केला. आपण यावेळी दररोज 130 ते 150 किलोमीटरचे अंतर सायकलवरून कापत होतो. प्रवासादरम्यान प्रत्येक राज्यात आपले उत्स्फूर्त स्वागत होत होते. प्रत्येक जण विचारपूस करून खाण्यासाठी काहीतरी देत होते. काळजी करत होते, असे सांगितले.
सत्काराप्रसंगी हितचिंतक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभिनंदन बाळा,
अनंत घाणेकर |
अगदि नावाप्रमाणेच, अनंत विचारांचे कर्तव्य बजावले आहेस तू ,या विचारांची समाजात सर्वांनीच कास धरली तर, ” धरतीवर स्वर्ग वसयला उशीर लागणार नाही.
वंदेमातरम
वंदेमातरम |
या स्वतंत्र देशात आशा ,अनंतांचे वारे घुमून जगावरील , अमानवतेचे किंवा मानवतेला काळिमा फासणारे संकट टळू दे |