बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या चार आरोपीना आज अधिक चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीने माळमारुती पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने या आरोपीना चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.
बेळगाव शहरातील अंजनेय नगर येथील रिअल इस्टेट व्यवसायिक संतोष पद्मण्णावर यांचा त्यांची पत्नी उमा पद्मण्णावर हिने आपल्या फेसबुक फ्रेंड्स च्या मदतीने खुन केला होता. तपासानंतर माळमारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय कालीमिर्ची आणि सहकाऱ्यांनी उमा पद्मण्णावर शोभित गौडा, पावन आणि मंजुनाथ या चार आरोपीना अटक करून न्यायालयाच्या समोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज या खून प्रकरणाच्या अधिक तपासासाठी माळमारुती पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने चार दिवसांसाठी पोलीस कस्टडीत घेतले. आज २२ ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजल्यापासून २५ ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माळमारुती पोलीस आरोपींची चौकशी करणार आहेत. दुसरे जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश पंकजा कोण्णूर यांनी आरोपीना पोलीस कस्टडीची परवानगी दिल्याचे ऍड. शामसुंदर पत्तार यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta