Wednesday , October 23 2024
Breaking News

हिरे बुंदनुर येथे श्री बाळूमामा जयंती उत्सव संपन्न

Spread the love

 

बेळगाव : हिरे बुंदनुर येथे श्री बाळूमामा जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाली. यावेळी श्री. व्ही. बी. उन्नी परिवाराकडून देण्यात आलेल्या 3 लाख 75 हजार रुपये देणगीतून श्री बाळूमामांची चांदीची उत्सव मूर्ती तयार करण्यात आली होती. जयंती उत्सवानिमित्त सदर मूर्तीची मिरवणूक श्री बाळ्या स्वामी मठापासून करण्यात आली. यावेळी गावातील सर्व सुहासिनी आरती व कलश घेऊन तसेच श्री पंढरपूर संतांचे भजनी मंडळाचे भजन व श्री हेगडी अज्यांच्या संघातर्फे लेझीम व ढोल ताशा या सर्वांच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडली. या उत्सवाला आजूबाजूच्या वीस गावापेक्षा जास्त गावातून भाविक उपस्थित होते. गावातील सर्व लहान मोठ्या देवळातून भेटी घेत प्रमुख रस्त्यावरून ही मिरवणूक श्री बाळूमामा देवस्थान येथे दाखल झाली. श्री बाळूमामांची उत्सव मूर्ती मंदिरात आल्यानंतर रुद्राभिषेक व महाप्रसाद द संपन्न झाला. सायंकाळी विराप्पा उंनी व त्यांच्या धर्मपत्नी अनुसया उन्नी तसेच वीरेश कोठूर व चैत्रा कोठूर यांच्या हस्ते मूर्तिकार सतीश पत्तार बेळगांव यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर राज्य राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक हिरे बुंदनुर आणि हा रोग ऑफ सरकारी उच्च माध्यमिक शाळा, तसेच कुटरनदि सरकारी उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक आय आर काजगार या सगळ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कमिटी अध्यक्ष नागराज देसाई तसेच सर्व सदस्य हिरे बुंदनूर ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती मंजुळा नाचकर, देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी रायाप्पा हुनशीकट्टि सर्व सदस्य आणि प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. उत्सवाला 5000 पेक्षा जास्त भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सॉफ्ट बॉल क्रिकेट असोसिएशच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन…

Spread the love  आयपीएलच्या धर्तीवर नियोजन … बेळगाव : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक टीम केली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *