बेळगाव : एका अट्टल दुचाकी चोराला अटक करून शहापूर पोलिसांनी त्याच्याजवळून २ लाख ८ हजार रुपये किमतीच्या पाच स्प्लेन्डर मोटरसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
बाळकृष्ण परसप्पा होसमनी (वय २७) रा. लक्ष्मी गल्ली खणगाव बी. के. सध्या रा. मलप्रभानगर, वडगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी, उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, एन. एस. बसवा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.आय. सनदी, शिवशंकर गुडदयगोळ, श्रीधर तळवार, जगदीश हदीमनी, शिवराज पच्चन्नावर व सिद्धरामेश्वर मुगळखोड आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.