बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील गौडवाडा येथील वैशाली कोटबागी नावाच्या २० वर्षीय बाळंतिणीचा काल बेळगावच्या बिम्स रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा संताप व्यक्त करत महिला मोर्चा भाजप कर्नाटकतर्फे सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या तसेच काँग्रेस सरकारच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यात आला. दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी.
योग्य काळजी आणि आरोग्य सेवेशिवाय या महिलांचा मृत्यू ही खरी समस्या आहे आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नुकतेच आम्ही हिवाळी अधिवेशनात याच मुद्द्यावर विरोध केला पण निष्फळ ठरला, असल्याचा आरोप राज्य भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला.