Thursday , December 11 2025
Breaking News

डॉ. हर्षा अष्टेकर आणि रोशनी मुळीक यांचा जायंट्स मेनतर्फे सत्कार

Spread the love

 

बेळगाव : कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादित केलेल्या डॉ. हर्षा अष्टेकर आणि रोशनी मुळीक यांचा जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला.
डॉ. हर्षा अष्टेकर यांचे शालेय शिक्षण मराठीतून होऊनसुद्धा त्यांनी फार्मसीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून मंगळूर येथील निट्टे विद्यापीठातुन डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. डॉक्टरेटचा अभ्यास करीत असताना त्यांनी पार्किन्सन्स रोगाच्या उपचारात पायराझोलोन डेरीव्हॅटिव्हजचे डिझाइन डेव्हलपमेंट हा विषय घेतला होता. यामध्ये संशोधन करून त्या यशस्वी झाल्या असून त्याच्या पेटंटसाठीसुद्धा अर्ज केला आहे.
सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या आपल्या मामाच्या प्रेरणेतून बेळगावच्या कंग्राळी बुद्रुक येथील रोशनी मुळीक या तरुणीने बीएसएफमध्ये झेप घेतली आहे. सैन्यदलाच्या गणवेशातील मामाचा आदर्श नजरेसमोर ठेवून गेल्या दोन वर्षांपासून खडतर मेहनत घेऊन रोशनीने केलेल्या कार्याला यश आले आहे. सुरुवातीपासून वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात आपले कौशल्य दाखवणाऱ्या रोशनी हिने आपले स्वप्न साकार केले.
या दोघींचाही सत्कार सौ. रंजना पाटील आणि सौ. प्रणाली पाटील यांच्याहस्ते शाल गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला.
या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव यल्लाप्पा पाटील यांनी केले. डॉ. विनोद गायकवाड यांनी त्यांचा गुणगौरव करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रोशनी मुळीक आणि डॉ. हर्षा अष्टेकर यांनी आपला जीवनपट उलगडत सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन बामणे यांनी केले.
अध्यक्ष अविनाश पाटील, माजी अध्यक्ष उमेश पाटील, मधू पाटील, सुनिल भोसले, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, मधू बेळगावकर, मुकुंद महागावकर, महेश शहापुरकर, वाय एन पाटील, प्रदीप चव्हाण, मल्लिकार्जुन सत्तीगेरी, विजय बनसुर, आनंद कुलकर्णी, विजय पाटील, मंजुनाथ शिरोडकर, एस एस पाटील अजित कोकणे, प्रकाश तांजी तसेच सत्करमूर्तींचे कुटुंबीय उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *