
कावळेवाडी : प्रत्येकाकडे कोणतीतरी कला अवगत असते वाचन करा, लिहा मनातील भावना व्यक्त करा. कवितेतून मांडायला हवे वास्तव चित्रण समाजात पोहोचले पाहिजे. सुरुवातीला टिका होते.अपयश पचवा, पुन्हा आत्मविश्वासाने पुढे चला. नवोदिताना प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी सामाजिक संस्था कार्यरत आहे हे कौतुकास्पद आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. अहंकार मीपणा बाजूला ठेवून विधायक कार्य करा शिक्षणातून माणूस पुढे जातो.पुस्तके आपणांस जगण्याचं बळ देतात, असे मौलिक विचार कवी महादेव खोत यांनी मांडले ते प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या काव्य लेखन स्पर्धेच्या बक्षीस समारंभात बोलत होते.
हा बक्षीस समारंभ कार्यक्रम बिजगर्णी हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
सुरूवातीला प्रशालेच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. सावित्री बाईफुले फोटो पूजन सौ. सविता वेसणे हस्ते तर सरस्वती फोटो पूजन क्रीडा मार्गदर्शक विवेक पाटील यांच्या हस्ते झाले. मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले.
प्रास्ताविक वाय पी नाईक यांनी करून, संस्थेतर्फे गेले आठ वर्षे मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे पुढील काळात अधिकाधिक सामाजिक कार्य विधायक होण्यासाठी प्रयत्न असेल, उपक्रमांचा आढावा घेतला.
काव्य लेखन स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या, खुला गट प्रथम क्रमांक भरत गावडे, द्वितीय म्हातरु भातकांडे, तृतीय सरोज जाधव, विद्यार्थी गट विजेते अनुष्का राजीव पाटील, मराठी विद्यानिकेतन बेळगाव, भक्ती युवराज बाळेकुंद्री बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी, वैष्णवी रवळू जाधव प्राथमिक शाळा बिजगर्णी या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
या निमित्ताने महादेव खोत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ते दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत आपली कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे हा सार्थ अभिमान वाटतो.
यावेळी व्यासपीठावर वाय पी नाईक, कोमल गावडे, ए. एल. निलजकर, सविता वेसणे, विवेक पाटील, महादेव खोत, के.आर.भाष्कर, यशवंत मोरे, सातेरी जाधव, सूरज कणबरकर तेजस्विनी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोमल गावडे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना कवी निर्माण होत नाहीत, ज्ञान, प्रतिभा प्रगल्भता वाचनातून कविता स्फुरते त्यासाठी व्यासंग महत्त्वाचा असतो सामाजिक प्रबोधन करणारे साहित्य हवं. तरच ते वाचकांना भिडते वाचन लेखन करा. मी शिक्षक का झालो. ही अंतर्मुख करणारी वास्तव चित्रण कविता सादर करुन कार्यक्रमात वैचारिक मंथन केले.
याप्रसंगी अनुष्का पाटील, भक्ती बाळेकुंद्री, वैष्णवी जाधव, म्हातरु भातकांडे, सरोज जाधव यांनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी विवेक पाटील, यशवंत मोरे, सविता वेसणे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक रमेश कांबळे, एम पी मोरे, लक्ष्मण जाधव, सुरेश निंबाळकर, राजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
सूत्रसंचालन भाग्यश्री कदम यांनी केले. आभार मनोहर प मोरे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta