
बेळगाव : भारत सरकारच्या भाषा, जात अल्पसंख्यांक आयोगाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर एस. शिवकुमार हे भाषिक अल्पसंख्यांकांच्या समस्याबाबत चर्चा करण्यासाठी बेळगावला आले आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांशी ते चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे एक शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 नंतर ही भेट होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी व त्यांची भेट घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta