अथणी : अथणी तालुक्यातील अनंतपूर गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात ग्रामपंचायत पीडीओचा जागीच मृत्यू झाला.
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता अनंतपूर गावातून तांवशी मार्गावर जात असताना झालेल्या अपघातात नागनूर पा. गावातील अशोक सनदी (48) यांचा मृत्यू झाला.
गेल्या 20 वर्षांपासून ते विविध ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत होते आणि आजारपणामुळे गेल्या 6 महिन्यांपासून घरीच आराम करत होते. अनंतपूर गावी वैयक्तिक कामानिमित्त गेलेल्या अशोक यांचा घरी परतत असताना अपघात झाला. अपघातात दुचाकीचा मागचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून मागून कोणीतरी धडक दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta