बेळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या महिलांचा सत्कार करून त्यांचे योगदान सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले प्रतिमाँ पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. रेणू किल्लेकर यांनी प्रास्ताविक आणि अध्यक्षीय भाषणातून महिलांच्या सक्षमीकरणावर प्रकाश टाकला. यावेळी सौ. वैष्णवी मुळीक यांची कन्या भारतीय सैन्यात दाखल झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी महापौर सौ. सरिता पाटील यांच्या कन्येने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्याने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय, ताराराणी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सौ. सुधा भातकांडे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित महिला मान्यवरांनी महिलांच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी विचार मांडले. सौ. प्रिया कुडची यांनी सूत्रसंचालन, सौ. अर्चना कावळे यांनी पाहुण्यांचा परिचय आणि सौ. मंजुश्री कोलेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास सौ. आशा सुपली, रेखा गोजगेकर, दीपा मुटकेकर, अनुपमा कोकणे, श्रेया मंडोळकर, राजश्री बादमनजी, शामिनी पाटील, आशा पाटील, माला जाधव, रत्ना, लक्ष्मी कुरणे महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta