बेळगाव : सुळगा (हिं) येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि पारितोषिक वितरण असा संयुक्त सोहळा पार पडला.
मुख्याद्यापक श्री. आर. ए. गुगवाड यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष श्री. देवाप्पा ठाणू पाटील, उपाध्यक्ष श्री. भाऊराव आण्णाप्पा गडकरी, आणि उपस्थित मान्यवराच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन वदीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. मुख्याध्यापकांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहशिक्षिका श्रीमती एम एम बिर्जे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या हस्ते या वर्षीचा आदर्श विद्यार्थी कु. प्रथमेश नोगेश जाधव व आदर्श विद्यार्थीनी कु.रुपाली अनिल कदम यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती व्ही.सी. अनगोळकर मॅडमनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता दहावीच्या विध्यार्थ्यांनी चार सिलिंग फॅन शाळेला भेटवस्तू दिली. शाळेचे सहशिक्षक एन के चौगुले सरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री भाऊराव आण्णाप्पा गडकरी यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. व अध्यक्ष श्री. देवाप्पा ठाणू पाटील यांनी विद्यार्थ्यांना मौलीक मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.देवाप्पा ठाणू पाटील हे होते, याप्रसंगी सेक्रेटरी श्री बी.डी. पाटील,ज्येष्ठ संचालक श्री कृष्णा ओमाण्णा पाटील, श्री प्रकाश महादेव पाटील, श्री प्रकाश लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते. श्रीमती टी डी गवई उपस्थिताचे आभार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी. एम. पाटील यांनी केले. या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग, आजी माझी विद्यार्थी उपस्थित होते.