बेळगाव : सुट्टी न दिल्याने प्रचंड नाराज झालेल्या चालकाने बसमध्ये आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. भालचंद्र एस तुकोजी (वय 45) रा. रामदुर्ग तालुका बेळगाव जिल्हा असे या आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.
भालचंद्र तुकोजी यांच्या बहिणीच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांनी सुट्टी मागितली होती पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुट्टी दिली नसल्याचे नाराज झालेल्या भालचंद्रने बेळगाव आगार क्र. 2 येथे उभ्या असलेल्या बसमध्येच पहाटे गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. भालचंद्र यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.