बेळगाव : बळ्ळारी येथे एप्सिलॉन कंपनी व बेळगाव डिस्ट्रीक बॉडीबिल्डींग अँड स्पोर्ट्स संघटना आयोजित एप्सिलॉन फिटनेस शरीरसौष्ठव स्पर्धेत संदीपकुमार याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर विजेतेपद पटकाविले.
एप्सिलॉन कंपनीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या एप्सिलॉन फिटनेस मर्यादीत शरीरसौष्ठव स्पर्धेत जवळपास 30 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी एप्सिलॉन कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक रोशन प्रभाकर, राजेश प्रधानसह इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. या स्पर्धेत विजेता संदीपकुमार, पहिला उपविजेता मानसकुमार, तर प्रमोदने दुसरे उपविजेतेपद पटकाविले. रोशन प्रभाकर, राजेश प्रधान, राजेश लोहार, अनिल आंबरोळे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना चषक, प्रमाणपत्र व रोखरक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अनिल आंबरोळे, राजेश लोहार, बाबु पावशे यांनी काम पाहिले. तर स्टेज मार्शल म्हणून श्रीधर बाराटक्के यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एप्सिलॉन जिमचे प्रशिक्षक राजकुमार दोरगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.