बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती-सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना हद्दपारची नोटीस देण्यात आली होती, या नोटीस ला उत्तर देण्यासाठी ऍड. महेश बिर्जे यांनी आज वकालत पत्र दाखल केलं. महेश बिर्जे यांच्या वतीने एडवोकेट बाळासाहेब कागणकर आणि एडवोकेट रिचमेन रिकी यांनी उपस्थित राहून यावर युक्तिवाद केला. आणि पुढील तारीख मागितली येत्या सात तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता पुढील सुनावणी होणार अशी माहिती वकिलांनी दिली. त्याचबरोबर शुभम शेळके यांना सोबत घेऊन वकिलांनी पुढील तारखेला यावं अशी सूचना वकिलांना करण्यात आली आहे.