
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दि ३ एप्रिल पासून रोज सायंकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत इस्कॉनचे ज्येष्ठ भक्त मुंबईचे श्री विश्वरूप प्रभुजी यांचे रामनवमी बाबत कथाकथन होईल.
दिनांक ६ एप्रिल रोजी मुख्य कार्यक्रम असून त्या दिवशी सायंकाळी किर्तन, अभिषेक आणि प्रवचन आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद असे कार्यक्रम होतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta