
बेळगाव : बेळगाव शहरातील मराठा मंडळ संलग्न पदवीपूर्व विद्यालयातील एसएसएलसी परीक्षा केंद्राला जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी बुधवारी भेट दिली आणि संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली.
परीक्षा केंद्रात बसवलेल्या सीसीटीव्ही प्रणालीसह अन्य सुरक्षाव्यवस्थांची तपासणी करण्यात आली. यावेळी सुरू असलेल्या विज्ञान परीक्षेसाठी नोंदणीकृत 607 विद्यार्थ्यांपैकी 592 विद्यार्थी परीक्षेस हजर होते, तर 15 विद्यार्थी गैरहजर असल्याची नोंद झाली.
या वेळी क्षेत्रीय शिक्षणाधिकारी रवी बजंत्री, जिल्हा नोडल अधिकारी एन. आर. पाटील, मराठा मंडळ परीक्षा केंद्राच्या मुख्य अधीक्षिका लता शिंदे, तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta