दावणगेरे : दावणगेरे येथे बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बेळगाव येथील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बसवराजप्पा (38), श्रीधर (32), विजय कुमार (35) अशी मृतांची नावे आहेत. सर्व मृत मूळचे बेळगावचे असल्याची माहिती आहे.
ही घटना मायकोंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.