
बेळगाव : 1 जून 1986 रोजी झालेल्या कर्नाटक -महाराष्ट्र सीमावादाच्या आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हिंडलगा येथे भव्य हुतात्मा “स्मृती भवन” उभारण्यात येणार असून आत्ता बांधकामावर कर्नाटक प्रशासनाची वक्रदृष्टी पडली आहे.
आज सकाळी काही कन्नड संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनाचे सादरीकरण बुधवारी सकाळी समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले.
यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, परवानगी नसताना होत असलेल्या “स्मृती भवना”च्या बांधकामाला कायदेशीर नोटीस जारी करणार आहोत. कुणीही नियमाचे पालन न करता कोणतेही पाऊल उचलू शकत नाही. जिल्ह्यात शांतता आणि सौहार्दतेला बाधा येणार नाही याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
Belgaum Varta Belgaum Varta