
बेळगाव : येळ्ळूर येथील समिती स्कूलच्या मैदानावर मेणसे फिटनेस क्लब आयोजित बेळगाव जिल्हा शरीर संघटनेच्या मान्यतेने मेणसे फिटनेस टॉपटेन शरीरसौष्ठव स्पर्धेत साहील पाटील अव्वल ठरला. या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे : साहिल पाटील, कल्पेश कुंडेकर, आकाश जोगानी, चेतन पेडणेकर, हणमंत पाटील, किशोर बिजगर्णीकर, ओमकार येळवी, प्रथमेश उंदरे, अनिकेत पाटील, रोहित आवचारी.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, अरविंद पाटील, दुधाप्पा बागेवाडी, शशिकांत धुळजी, जोतिबा चौगुले, विलास बेडरे, राकेश परीट, सतीश देसुरकर, राजू उघाडे, राजू पावले, प्रसाद गोरल, जोतिबा नंदिहळ्ळी, उपेंद्र नाईक, अमित पाटील, सुनील पाटील, विजय धामणेकर, नागेंद्र मडिवाळ, पुंडलिक जैनोजी, यल्लाप्पा पाटील, कृष्णा बिजगरकर, बाळकृष्ण धामणेकर, अजित गोरल, अमित हलगेकर, परशराम कणबरकर, नारायण काकतकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta