बेळगाव : थायलंड पटाया येथे नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगांवचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री याने सुवर्णपदक
व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून उत्तीर्ण झालेल्या राजेश लोहार यांचे धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्या समोर बुधवार ता 14 मे रोजी सकाळी 11.00 जंगी स्वागत करण्यात येणार आहे, विनोदने भारताचे प्रतिनिधित्व करीत 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले होते. या बेळगांवच्या खेळाडूचे व पंच राजेश यांचे प्रमुख पाहुणे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व अँड स्पोर्ट्सचे अध्यक्ष संजय सुंठकर, जिल्हा अध्यक्ष महेश सातपुते, मिस्टर इंडिया रणजीत किल्लेकर, श्रीरामसेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय नेते रमाकांत कोंडुसकर, दलीत नेते मल्लेश चौगुले. अनिल अंबरोळे, नारायण चौगुले, प्रविण कणबरकर, जितेंद्र काकतीकर, मिस्टर आशियाई आंतरराष्ट्रीय पंच प्रेमनाथ नाईक, गणेश दड्डीकर, विजय चौगुले, चेतन ताशिलदार, बाबु पावशे, संतोष सुतार, नागेंद्र मडिवाळ, सुनील बोकडे, भरत बाळेकुंद्री, प्रेमकांत पाटील, अँड रियाज शेख, संतोष हलगेकर, सुदिप चौगुले, विनोद सोलापुरे, तसेच बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्ट्सचे पदाधिकारी विविध दलीत संघटना व बेळगांवातील विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta