संकेश्वर : दिनांक २४ शंकराचार्य पीठातील शंकरलिंग मंदिरात स्टोन वॉशिंगने स्वच्छतेचे काम मठाधिपती श्री सचिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामींच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात सुरू आहे. इ. स. १२२२ मध्ये “रट्ट” काळात “जखनाचार्य” यांनी बांधलेले मुख्य शंकरलिंग मंदिर “हेमांडपथी” रचनेचे असून इ. स. १४९९ मध्ये यावर “शंकराचार्य पिठाची परंपरा” सुरू …
Read More »संकेश्वर स्थायी समिती सभापतीपदी प्रमोद होसमणी यांची निवड
संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेची मंगळवारी बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा व निधी मंजूर करण्यात आला. पालिकेतर्फे एससी एसटी विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापतीपदी म्हणून प्रमोद होसमणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी यांच्यावतीने होसमणी यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत …
Read More »हुक्केरीतील चोरी प्रकरणांचा दोन दिवसांत लावला छडा
हुक्केरी : हुक्केरी शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात हुक्केरी पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे यांना यश आले आहे. शहरातील बुद्ध बसव आंबेडकर सहकारी संस्था व किराणा दुकानात झालेल्या चोरी प्रकारचा छडा ४८ तासांत लावून आरोपीला पकडून हुक्केरी न्यायालयाच्या ताब्यात दिले. बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमा शंकर …
Read More »संकेश्वर : पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम भूसगोळ विजयी
संकेश्वर : संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम गणपती भूसगोळ यांनी बाजी मारली असून काँग्रेसच्या उमेदवार भारती मरडी यांना 345 तर अपक्ष उमेदवार गंगाराम भुसगोळ यांना 448 मते पडली. गंगाराम गणपती भूसगोळ यांनी काँग्रेसच्या श्रीमती भारती जितेंद्र मरडी यांचा 130 मतांनी पराभव करून विजयी …
Read More »हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी सुधाताई माने तर उपाध्यक्षपदी मल्लाप्पा खोत यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत सदस्य आनंद शेंडे, …
Read More »संकेश्वर : प्रभाग 21 पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
संकेश्वर : प्रभाग 21 पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. दिवंगत आप्पाजी मर्डी यांच्या निधन झालेल्या रिक्त जागेसाठी भारती मर्डी काँग्रेस व गंगाराम भुसगोळ अपक्ष असे रिंगणात उभे राहिले आहेत. गत चार दिवसांपासून दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. शनिवार 23 रोजी मतदान, मंगळवार दि.26 रोजी निकाल जाहीर …
Read More »घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू
हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हुक्केरी तालुक्याच्या बेनकनहोळी गावानजीक घटप्रभा नदीत रविवारी सायंकाळी घडली आहे. लक्ष्मण राम अंबली (वय 49), रमेश लक्ष्मण अंबली (वय 14) आणि यल्लाप्पा लक्ष्मण अंबली (वय 12) अशी मृतांची नावे …
Read More »पिस्तुलाचा धाक दाखवून केरळच्या व्यापाऱ्याला दरोडेखोरांनी लुटले; 75 लाख रुपयांचा ऐवज व कारसह पलायन
संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हरगापुर गावाजवळ दरोडेखोरांनी कार आडविली व व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून कारमधील 75 लाख रुपयांचा ऐवज लंपास करून पलायन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरहून केरळकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचा दरोडेखोरांनी सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग केला व हरगापुर गावाजवळ कार थांबवली व त्यांनी पिस्तुलचा …
Read More »मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या
संकेश्वर : हरगापुरगड येथील मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने दारुच्या नशेत घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनिल विश्वनाथ भोसले (वय 30) असे त्यांचे नांव आहे. अनिल याने लोकांकडून उसने पैसे घेतले होते. काही वर्षापासून तो दारुच्या आहारी गेला होता. दारु पिऊ नकोस म्हणून कुटुंबातील त्याला सांगत …
Read More »संकेश्वर बस स्थानकात अडीच तोळ्याचे दागिने लंपास
संकेश्वर : येथील बस स्थानकात बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतील अडीच तोळ्याचे सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी ४ वाजता घडली. यामुळे बस स्थानकातील दुबळ्या सुरक्षा यंत्रणेमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी सौ. अंजना शिवानंद जळके रा. बसवान …
Read More »