संकेश्वर : जीवनाला कंटाळून दोन भावांनी आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात ही दुर्घटना घडली. लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन्ही भावांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्यााचे समजतते.
संतोष रवींद्र गुंडे (५५) आणि अण्णासाहेब रवींद्र गुंडे (५०) हे मृत भाऊ आहेत. लग्न न झाल्याने दोन्ही भावांना दारूचे व्यसन होते. त्यांनी दारूमध्ये विष मिसळले आणि ते प्यायले. लगेचच शेजाऱ्यांनी त्यांना महाराष्ट्रातील गडहिंग्लज शहरातील रुग्णालयात दाखल केले. पण दोघांचाही कोणताही उपचार न होता मृत्यू झाला.
संकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.