
बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी उत्तीर्ण व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.एस. मोरे होते.
प्रारंभी स्वागत गीतांनी सुरूवात केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले.
प्रास्ताविक संस्था अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी करून राबवित असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन गुणवत्ता सिद्ध केले आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी. प्रेरणा व प्रोत्साहनामुळे भविष्यात अधिक वैचारिक बळ मिळते म्हणून असे उपक्रम सलग सहा वर्षे राबवित आहोत असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते सह्याद्री सोसायटीचे संचालक हर्षवर्धन कोळसेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हेच समाज परिवर्तन घडवून आणते भविष्यात आपण समाजासाठी कार्य करण्याची उमेद बाळगा. जिद्द चिकाटीने अभ्यास करून करिअर घडवा. संस्कार महत्त्वाचे असतात मोठ्यांचा आदर करा नम्रता हीच खरी गुणवत्ता आहे, असे मौलिक विचार त्यांनी व्यक्त केले.
विनायक पाटील, रविना बसरीमरद, यांनीही मनोगत व्यक्त करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कष्ट करून अभ्यासातून व्यक्तिमत्त्व घडविले आहे असे स्पष्ट केले.
यावेळी प्रतिक्षा तरवाल हिने गौरव केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी प्राजक्ता चौगुले (बालवीर बेळगुंदी प्रथम क्रमांक ९८.४०%), मंगल नागेनहट्टीकर (९४.०८, कर्ले ज्योती हाय.), श्वेता कडोलकर (९०.२४, बेळगुंदी हायस्कूल), वैशाली नाईक व अंकिता सुतार (बेळवट्टी हायस्कूल प्रथम क्रमांक (८९.९२), प्रियांका तारीहाळकर (८२% बिजगर्णी), आकांक्षा देसाई (कर्ले माध्यमिक ८८%), सुमित मोरे ८६ टक्के, राकसकोप, तनिष्का किणयेकर (बेळगुंदी सेंटपाॅल हाय. बेळगाव ९६.६४%) तसेच गावातील बारावी उत्तीर्ण प्रणाली कणबरकर ९३%, किरण बुरुड 75%, तनुजा बाचीकर, सानिका यळ्ळूरकर.
गावातील दहावी उत्तीर्ण कु. सृष्टी यळ्ळूरकर, नयन गावडे, नंदिनी बाचीकर, श्रेया जाधव, नारायण बाचीकर, ऋषिकेश कणबरकर, योगेश मोरे, मंथन मोरे, शरण्या वि. बसरीमरद (९४%, हेरवाडकर स्कूल, प्रतिक्षा प्रकाश तरवाळ, (गोवा सी बी एस इ), ओम् भाऊराव मोरे, बारावी उत्तीर्ण ८७%.
यावेळी जागतिक पातळीवर कृषी तंत्रज्ञान देशाला हितकारक ही प्रतिकृती डेन्मार्क येथील स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करुन प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल रविना बसरीमरद (नागपूर) हिचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन संचालक हर्षवर्धन कोळसेकर यांचाही यल्लापा बेळगावकर यांच्या हस्ते, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर पांडुरंग मोरे, यल्लापा बेळगावकर, विनायक पाटील, सुरेश किणयेकर, मोणापा सुतार, अशोक कडोलकर, शिवाजी जाधव, एम.पी मोरे, यशवंतराव मोरे, के. डी. यळुरकर, जोतिबा मोरे, रामचंद्र मोरे, यल्लापा बुरुड, वाय पी नाईक, वसंत हेब्बाळकर, हर्षवर्धन कोळसेकर, शशिकांत गावडे, आशा बाचीकर, रेणुका मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नयन जाधव हिने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन पत्राचे वाचन केले.
सूत्रसंचालन किरण बाबुराव जाधव, किशोर पाटील यांनी केले. आभार निवृत्त शिक्षक के. आर. भाष्कर यांनी केले.
या गौरव सोहळ्याला पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta