Sunday , May 31 2026
Breaking News

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love

 

शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना

निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, शहरांतर्गत येणारे अनेक भाग मूलभूत सुविधांपासूनच वंचित आहेत ऐन उन्हाळ्यात जलवाहिन्यांना गळती लागत आहे. चारच दिवसांनी बेळगाव नात्यावरील जलवाहिनीची दुरुस्ती केली होती. पण आता पुन्हा घरची लागल्याने नागरिकांना कुठे सहा ‌ दिवस तर कुठे सात दिवसाला नळाचे पाणी मिळत आहे. त्यामुळे शहर विस्तारूनही येथील पाणी प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. निवडणुका आल्यावरच राजकीय मंडळींना पाणी आठवत असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.
जवाहर तलावातील पाणीही अंतिम टप्प्यात आले असून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका अपयशी ठरली आहे. ऐन उन्हाळ्यात कुपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. जलवाहिन्यांना वारंवार गळत्या लागत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना टँकर विकत घेण्याचा भुर्दंड बसत आहे.
उपनगरातही अनेक ठिकाणी जलवाहिन्या जमिनीत घालून नळ जोडण्यात आले आहेत. पण पाण्याचा दाब कमी असल्याने नागरिकांना जारचे पाणी विकत आणावे लागत आहेत.
काही प्रभागात नळांना सतत पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. त्याकडे मात्र नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
——————————————————————–
‘शहर आणि उपनगरात पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकली आहे . पण काही ठिकाणी पाणीच येत नाही. आलेच तर रात्री नागरिकांना जागरण करून पाणी भरावे लागत आहे. हॉल्वच्या ठिकाणी गटारी असल्याने सांडपाणी नळामधून पुरवठा होत आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे. शिवाय जलवाहिन्यांना लागलेल्या गळत्य व्यवस्थित काढणे आवश्यक आहे.’
-मज्जिद सय्यद, माजी नगरसेवक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

हालसिद्धनाथ साखर कारखान्यातील साखर चोरी प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याची रयत संघटनेची मागणी

Spread the love  निपाणी (वार्ता) : दोन वर्षांपूर्वी निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात पदाधिकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *