Sunday , July 26 2026
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये सी.बी.एस्.ई शालेय शिक्षकांकरिता कार्यशाळा

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प येथे सी.बी.एस्.ई. शाळेच्या शिक्षकांसाठी दोन दिवसीय विशेष ‘क्षमता विकास कार्यक्रम’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. शाळेचे प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली २९ आणि ३० मे २०२६ रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी ‘वर्ग व्यवस्थापन’ हा या कार्यशाळेचा मुख्य विषय होता.
या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत विविध शहरांतून आलेल्या सी.बी.एस्.ई. शाळांच्या एकूण ६० शिक्षकांनी अत्यंत उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. या दोन दिवस झालेल्या सत्रात भरतेश सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य श्रीमती देवयानी देसाई आणि के.एल.ई. इंटरनॅशनल स्कूलचे गणित शिक्षक श्री. विनायक टोण्णी यांनी संपन्मूल व्यक्ती म्हणून लाभले. यांनी सर्व शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
वर्गातील अध्यापन अधिक प्रभावी करणे, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र समजून घेणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वर्ग कसा हाताळावा, यावर मार्गदर्शकांनी सविस्तर प्रकाश टाकला. प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या प्रेरणेने आणि ‘एकत्र शिकूया, समृद्ध होऊया’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन सर्व शिक्षकांनी यात सक्रिय सहभाग घेतला. यासाठी शालेय उपप्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर आणि शाळेच्या पी.आर.ओ श्रीमती उर्मिला किल्लेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
शेवटी शिक्षिका श्रीमती कृपा कदम यांनी सर्व मार्गदर्शक व उपस्थित शिक्षकांचे आभार मानून कार्यशाळेची यशस्वी सांगता केली.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *