Tuesday , September 17 2024
Breaking News

संकेश्वर

संकेश्वरात आठ हजार घरांवर तिरंगा डौलाने फडकणार..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेत देशाचा अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा अभियानाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी भूषविले होते. सभेला उद्देशून बोलताना मुख्याधिकारी आर. सी. चौगुला म्हणाले बेळगांव जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पालिका हर घर …

Read More »

हुक्केरी पोलिसांकडून दोघा आंतरराज्य भामट्यांकडून २२ लाख रुपयांचे सोन्याचे अलंकार जप्त

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी पोलिसांनी दोघा आंतरराज्य भामट्यांकडून २२ लाख रुपये किंमतीचे ४२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार जप्त केले आहे. याविषयीची पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, हुक्केरी कोर्ट सर्कल येथे चोर भामट्यांनी एका महिलेला भूलथापा घालून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पोबार केल्याची घटना हुक्केरी पोलिसांत नोंद करण्यात …

Read More »

तालुका मार्केटिंग सोसायटी प्रगतीपथावर : रमेश कत्ती

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी तालुका मार्केटिंग सोसायटी प्रगतीपथावर असून चालू आर्थिक वर्षात सोसायटीला २७ लाख रुपये नफा झाल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. सोसायटीतर्फे आयोजित नूतन मालवाहू ट्रक पूजन कार्यक्रमात सहभागी होऊन ते बोलत होते. सोसायटीने नव्याने खरेदी केलेल्या दोन मालवाहू …

Read More »

संकेश्वर पोलिसांनी केवळ तीनच तासात लावला अपहृत साईचा शोध!

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बसस्टँड येथे काल मंगळवारी दि. २ रोजी रात्री ८ वाजता ट्यूशनहून घरी परतणाऱ्या कु. साई भास्कर काकडे (वय १४) या मुलाला दोघा अपरिचित व्यक्तींनी गाठले. त्यांनी साईला लवकर चल तुझे वडील सिरीयस झालेत त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. असे सांगून साईला दुचाकीवर घेऊन ते …

Read More »

संकेश्वरात नागपंचमी उत्साहात साजरी

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात घरोघरी मातीच्या नागांची पूजा करुन नागपंचमी उत्साही आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली‌‌. श्रावणातील पहिला सण नागपंचमी परंपरागत पद्धतीने संकेश्वर परिसरात भक्तीमय वातावरणात सर्वत्र साजरा होतांना दिसला. येथील नाग देवता मंदिरात अभिषेक, महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वरातील कांही नागदेवता मंदिरात विशेष पूजा बांधण्यात …

Read More »

संकेश्वरात पैसा झाला खोटा….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात दहा रुपयांचे खणखणीत नाणे (क्वाॅईन) चलेणासे झाले आहे. त्यामुळे चलनातील दहा रुपयांच्या नाणेचे करायचे काय? हा प्रश्न लोकांपुढे निर्माण झालेला दिसत आहे. बाजारात काय बॅंकेत देखील दहा रुपयांचे नाणे स्विकारले जाईनासे झाले आहे. त्यामुळे चलनातील दहा रुपयांचे नाणे खोटे बनलेले दिसत आहे. संकेश्वरातील किराणा …

Read More »

संकेश्वरात डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सव वाढदिवस भरगच्च कार्यक्रमानी साजरा

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर येथील डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस वृक्षरोपांचे वाटप, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृद्धाश्रमात फळ वाटपाने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. प्रभाकर कोरे सौहार्द शाखा संकेश्वरच्या सदस्याना वृक्षरोपांचे वाटप संस्थेचे अध्यक्ष …

Read More »

एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेच्या “आझादी का अमृतमहोत्सवा”त पत्रकारांच्या गौरव..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्था संचलित एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेत आझादी का अमृतमहोत्सव १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ अखेर विविध भरगच्च कार्यक्रमानी साजरा केला जाणारा आहे. सदर कार्यक्रमाची सुरुवात आज पत्रकारांच्या हस्ते करुन त्यांचा गौरव करण्यात आला. पत्रकारांनी शाळेचे ध्वजारोहण, राष्ट्रपीता …

Read More »

हुक्केरी रोलर स्केटिंगपटूंचे घवघवीत यश

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. गडहिंग्लज येथ नुकतेच खुल्या पावसाळी रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटरनी सहभागी होऊन यश मिळवले आहे. सर्व विजेत्या स्केटिंगपटूंचे अकॅडमीच्या अध्यक्षा सौ. संगिता कल्याणकुमार निलाज यांनी …

Read More »

खणदाळ येथे उद्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव

संकेश्वर (महंमद मोमीन) : खणदाळ तालुका गडहिंग्लज येथील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती सोमवार दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांची राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »