Sunday , July 26 2026
Breaking News

संसुध्दी गल्ली वंदे मातरम् महिला ग्रुपतर्फे आझादी का अमृतमहोत्सव

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : येथील संसुध्दी गल्लीतील वंदे मातरम् महिला ग्रुपतर्फे आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. संसुध्दी गल्लीत ध्वजारोहणांने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सौ. पल्लवी कासारकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, प्रमुख पाहुणे हिन्दू नेते शिवराज नाईक, माजी सैनिक भिमप्पा बस्तवाडी, रयत संघटनेचे नेते लक्ष्मण बस्तवाडी, श्रीराम सेनेचे हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर, ॲड. प्रविण नेसरी, ॲड. शितल चोरगे, प्रिती पाटील यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या शालेय मुलींना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संजना पत्तार यांनी मानले. कार्यक्रमाला सौ. पूजा एस कासारकर, शारदा बस्तवाडी, सुजाता कुटोळी, शिल्पा बस्तवाडी, भारती आडी, अश्विनी शिरुर, शिक्षिका शालेय मुली उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *