Sunday , September 8 2024
Breaking News

संकेश्वर

हुक्केरीतून निखिल कत्ती विजयी

  बेळगाव : हुक्केरी मतदार संघावर गेल्या कित्येक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या कत्ती कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीला जनतेने आमदारकी बहाल केली असून दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचे सुपुत्र निखिल कत्ती यांनी या निवडणुकीत विजयश्री मिळविली आहे. विश्वनाथ कत्ती यांच्यानंतर उमेश कत्ती आणि आता निखिल कत्ती अशा पद्धतीने तिसऱ्या पिढीने राजकारणात यशस्वी प्रवेश …

Read More »

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील यादगुड गावात क्रिकेट खेळून शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. यमनाप्पा प्रकाश रेडरट्टी (वय 10) आणि येशू बसप्पा (वय 14) अशी पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेले दुर्दैवी मुले आहेत. ही दोन मुले क्रिकेट खेळून शेत तलावात पोहण्यासाठी …

Read More »

लाल बहादूर शास्त्री विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

  हुक्केरी (प्रतिनिधी) : मणगुत्ती (तालुका हुक्केरी) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी. के. स्वामी हे होते. प्रारंभी मुख्याध्यापक डी. के. स्वामी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. …

Read More »

ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रऊफखांन पठान यांना राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार हैद्राबाद येथे प्रदान

  डिचोली : डिचोली येथील राधाकृष्ण विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. रऊफखांन पठान यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील “अविष्कार फॉउंडेशन इंडिया” संस्थेतर्फे राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार हैद्राबाद येथे प्रदान सोहळा संपन्न झाला. हा पुरस्कार काल रविवार दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी हैद्राबाद येथील सालारजंग म्युझीयम सभागृहात एका शानदार कार्यक्रमात …

Read More »

पालिकेला “बकेट” वाटपाला मुहूर्त मिळेना…

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेला बकेट वाटपाला मुहुर्त मिळेनासा झाला आहे. संकेश्वरकरांना ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी पालिकेतर्फे प्लास्टिक बकेट वाटप केले जाणार आहेत. पण बकेट वाटपाचे कार्य आज-उद्यावर पुढे ढकलले जात आहे. त्यामुळे संकेश्वर नागरिकांतून बकेट वाटप कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वी पालिकेने एका …

Read More »

संकेश्वरात ईद- मिलाद जल्लोषात….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात मुस्लिम बांधवांनी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती, ईद मिलादुन्बी उत्साही वातावरणात जल्लोषात साजरी केली. ईद-मिलाद निमित्त जुम्मा मशीद येथून गावातील प्रमुख मार्गे जुलूस (मिरवणूक) काढण्यात आली. मिरवणुकीत सुन्नत जमात तंजिम कमिटी, महेदि (मोमीन) समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जुलूसमध्ये पैगंबरांचा (नारा) जयोघोष चाललेला …

Read More »

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जागतिक टपाल दिन साजरा

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जागतिक टपाल दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. टपाल दिनाचे औचित्य साधून योग साधकांना टपाल वाटप करण्यात आली. टपाल दिनानिमित्त सर्वांनी टपाल लिहिण्याविषयी सांगण्यात आले. त्यानुसार सौ. शैलजा जेरे यांनी बोलके पत्र लिहून सर्वांना योग करा निरोगी राहा. हा संदेश दिला आहे. …

Read More »

सोयाबीन काढणीला आता “नाईंटी हवी”….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरात सोयाबीन काढणी मळणीच्या कामाची धांदल उडालेली दिसत आहे. एकाच वेळी सर्वत्र सोयाबीन काढणी मळणीचे काम सुरू झाल्याने शेतमजूरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. शेतमालकांना सोयाबीन काढणी मळणीसाठी शेतमजुरांची मनधरणी करावी लागत आहे. शेतमजूरांच्या मागण्या वाढल्याने शेतकरी, शेतमालक डोक्याला हात लावून बसलेले दिसत आहेत. शेतमजूर सांगताहेत …

Read More »

संकेश्वरात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना दंड…..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर जुन्या पुणे-बेंगळूर महामार्गावरील शिवशक्ती जनरल स्टोअर्सने घनकचरा रस्त्यावर फेकून दिल्याने आज पालिकेने दंडात्मक कारवाई केलेली दिसत आहे. शिवशक्ती दुकान मालकाने कचरा रस्त्यावर फेकून दिल्याचे दिसून येताच आज पालिका सॅनेटरी सुपरवायझर श्रीधर बेळवी, मुकादम सुनिल पाटील, परशराम सत्यनाईक, कृष्णा खातेदार यांनी दुकान मालक वागाराम माळी …

Read More »

संकेश्वरात श्री बसवेश्वर यात्रोत्सव….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बसवाण गल्लीतील श्री बसवेश्वर देवस्थानची यात्रा विविध कार्यक्रमांनी, भक्तीमय वातावरणात पार पडली. गेले अकरा दिवस झाले मंदिरात अहोरात्र टाळ वाजवून शिवाची आराधना करण्यात आली. आज निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. श्रींनी देवाची पूजा करुन आपल्या प्रवचनात बसवेश्वरांची महती …

Read More »