Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावात २४.०२ तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.०२ टक्के तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव शहर परिसरात विविध ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानाला सुरुवात केली आहे. मतदारांनी मतदानासाठी सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे.
वाढत्या उन्हामुळे वयोवृद्ध तसेच महिलांना मतदान केंद्राकडे जाण्यास त्रास होत आहे. महाद्वार रोड येथील समिती कार्यकर्ते प्रवीण रेडकर यांनी रोड परिसरातील वृद्ध महिलांना त्यांच्या घरापासून ते मतदार केंद्रांपर्यंत स्वतःच्या दुचाकीवरून घेऊन जाऊन मतदान करून घेतले.

 

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *